पालकमंत्री चव्हाण यांच्यासह अन्य मंत्र्यांचे सहकार्य घेणार:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही;नवीन एसटीचे लोकार्पण केसरकर यांच्याहस्ते पडले पार
⚡सावंतवाडी ता.२७-: गावांची विकासकामे व्हावीत, अशी माझी कायम अपेक्षा राहिली आहे. दाभोली येथे आर्ट व्हीलेज तयार करणार. त्यातून या गावाचा पर्यटन विकास साधला जाईल. आर्ट व्हिलेज झाल्याचे दाभोली गावाचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल, अशी आपल्याला खात्री आहे. असे प्रतिपादन दीपक केसरकर आज येथे केला.दरम्यान आज दाभोली गावचे उपसरपंच यांचंसह सदस्यांनी आज केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला
यावेळी केसरकर बोलतान पुढे म्हणाले की दाभोली गावाच्या रस्त्यांसाठी २५ लाख रुपये आमदार फंडातून आपण देत आहोत. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेवून आपल्याला काम सुरू करायचे आहे.सावंतवाडी एस टी डेपो साठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सर्व डेपोना नवीन सहा बसेस देण्यात येणार आहेत. पुढच्या काळात जिल्ह्यातील सर्व रस्ते चांगल्या दर्जाचे झालेले दिसतील. जिल्ह्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न करणार आहे.असे ही केसरकर यावेळी बोलताना म्हणाले
जिल्हा महाराष्ट्रातील अग्रगण्य बनविण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य मंत्री यांना घेवून बनविणार आहे. कोलगाव गावाला नवीन नळ योजना देण्यात येणार आहे. २४ तास पाणी देणारे वेंगुर्ले शहर बनणार आहे.
शेतकरी, महिला सुखी होण्यासाठी महिला बचतगट प्रतिनिधी आणि युवक यांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना केले. यावेळी त्यांच्या हस्ते नव्याने प्राप्त झालेल्या एस टी चे लोकार्पण करण्यात आले.
