समर कॅम्पच्या माध्यमातून मिळणार क्रिकेटचे धडे

ए आय एम क्रिकेट अकादमीचे १५ ते ३० एप्रिल कालावधीत आयोजन

सावंतवाडी ता.२६-:जिल्ह्यातील पहिली रजिस्टर क्रिकेट अकादमी असलेल्या एआयएम क्रिकेट अकादमी यांच्यावतीने जिल्ह्यात पहिला क्रिकेट समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत दुपारी ३ ते ६ या वेळेत हा कॅम्प होणार आहे. आठ वर्षावरील मुले, मुलगी यात सहभागी होवू शकतात. प्रवेश सुरू झाला असून ९४०३५९४७७२, ८३९०४६५७१२ येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अद्यावत मशनरी उपलब्ध करून देण्यात आल्या असून बेटर बॅटिंग सेशन हे कॅम्पचे वैशिष्ट्य आहे. तज्ञ क्रिकेट कोच मार्गदर्शन करणार असून एस्ट्रो टर्फ आणि टर्फ विकेटवर नेट प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. ग्रुप फिटनेस ट्रेनिंग पर्सनल क्रिकेट ट्रेनिंग आणि प्रत्यक्ष मॅच अनुभव विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. अनुभवी फिटनेस ट्रेनर आणि डायट ट्रेनर मुलांना लेक्चर देणार आहेत.

You cannot copy content of this page