खारेपाटण हायस्कूलच्या मैदानावर जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स् प्रशिक्षण शिबीर

⚡कणकवली ता.२६-: ग्रामीण भारतातील गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या गुणांना पारखून त्यांना जिल्हा,राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडू बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेठ न. म. विद्यालय, ज्युनिअर कॉलेज खारेपाटण व सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिर २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे .
जिल्हास्तरावरून या शिबिरासाठी अनेक खेळाडू येणार असल्याने शिबिराचे स्वरूप हे निवासी व स्थानिक खेळाडूंसाठी अनिवासी अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे. शिबिराचा कालावधी हा १५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२३ असा आहे .तसेच शिबिराची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल. एकूण दहा दिवस हे शिबिर असेल.
या शिबिरात राज्य, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व अँथलेटिक्स् क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षण मुंबईतील महिला एस.एन.डी.टी कॉलेज च्या स्पोर्टस् ईंचार्ज सौ.सुवर्णा अभिजीत जोशी कु.अंजली जयसिंग गायकवाड (जिल्हा महिला प्रमुख प्रशिक्षक ),कु.प्राची दिनेश लाड ( राज्य खैळाडु) ,कु.स्वप्नाली भास्कर बेनकर ( राज्य खैळाडु) ,कु.हर्षदा बोडेकर ( राज्य खैळाडु) ,कु. सायली शेळके (राष्ट्रीय खैळाडु ) ,कु.माधवी शेगाळे ( राज्य खैळाडु ) , कु. ओम ऊन्हाळकर ( राज्य खेळाडु), कु.साहील शेंगाळे ( राज्य खैळाडू) व श्री.समीर राऊत ( एन.आय.एस अँथलेटिक्स् कोच व लेवल वन कोर्स होलर्डस ) हे मार्गदर्शन देणार आहे* .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच खारेपाटण पंचक्रोशीतील खेळाडूंना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.या संधीचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे व खारेपाटण हायस्कूल व जूनियर कॉलेजचे प्राचार्य श्री सानप यांनी केले आहे.
या ॲथलेटिक शिबिरामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक, थाळीफेक, शटल रन इत्यादी मैदानी क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण हे ५ वर्ष ते १८ वर्ष या वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी असणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर ७९००१९७४७५, ९५११८३५६६०, ८००७७४५०११, ९४२०२०६३०५ संपर्क करून व प्रवेश अर्ज साठी १) शेठ न.म.विद्यालय ज्यु. कॉलेज, खारेपाटण ता.कणकवली जि.सिंधुदुर्ग ( वेळ: स.१० ते दु १२ ,सोमवार ते शनिवार) व २) श्री फोंडकण देवी स्पोर्टस् अँकँडमी निरोम , भालचंद्र आपार्टमेंट, बिडयेवाडी ,दत्त मंदिर जवळ,कलमठ,कणकवली ,जि.सिंधुदुर्ग ( वेळ: स.१० ते दु १२ व दु.३ ते ७ ,सोमवार ते शनीवार) विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी करावी.नोंदणी ची अंतीम तारीख १२ एप्रिल २०२३ आहे.

You cannot copy content of this page