मानवाधिकार वेल्फेअरने असोसिएशनने केला गौरव
बांदा/प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशच्या वतीने आज कर्तव्यदक्ष अधिकारी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वेंगुर्ला तालुक्यात अतुल जाधव यांची २०२२ ला नियुक्ती करण्यात झाली होती. त्या कालावधीपासून आजपर्यंत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम करून कलम ३०२ च्या गुन्हाचा तपास करून गुन्हेगाराला शिक्षा केली. कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगाराना कसा चाप बसेल याचा प्रयत्न जाधव यानी करुन कायदसुव्यवस्था सुरळी ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या कार्याची दखल जनते पर्यंत पोहली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेल्फेअर असोसीएशन या संघटनेने आज त्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, सरचिटणीस विष्णू चव्हाण, ॲड. मोहन पाटणेकर, सोशल मीडिया अध्यक्ष आनंद कांडरकर, जिल्हा व्यापारी सेलचे बाळा कोरगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
