१९९३-९४ दहावी बॅचतर्फे माजी शिक्षक मारुती बांदेकर यांचा सन्मान

⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावच्या १९९३-९४ दहावी बॅचतर्फे माजी शिक्षक मारुती बांदेकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. बांदेकर यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान करण्यात आला.bयावेळी जमलेल्या माजी विद्यार्थांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थी संदीप सामंत, संतोष ठाकूर, रश्मी तेंडोलकर – भोगणे, सहदेव राऊळ, विवेक नार्वेकर, महेश पंतवालावलकर, गजानन राऊळ, एकनाथ खडपकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page