⚡कणकवली ता.१९-: कणकवली शहरातील महामार्ग ते नेहरूनगर मराठा मंडळ पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते करण्यात आला.
कणकवली शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून, यातीलच एक मंजुरी असलेला कणकवली महामार्ग ते नेहरूनगर मराठा मंडळ पर्यंतचा रस्ता आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली शहरातील अनेक रस्त्यांची डांबरीकरण करण्याच्या कामांना मंजुरी मिळाली असून, काही कामे पूर्ण झाली तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आम. नितेश राणे यांनी या कामांकरिता निधी आणला असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. नेहरूनगर मधील या कामाबद्दल नेहरूनगर वासियांमधून देखील यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय मालंडकर, राजन परब, संजय ठाकूर, मनोज हिर्लेकर, कल्याण पारकर आदि उपस्थित होते.
