“शिवगर्जना” नंतर आता “सिंधू महोत्सवा”ची केली घोषणा
⚡कुडाळ ता.१९-: माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “शिवगर्जना” हे महानाट्य कुडाळ नवीन एसटी डेपोच्या मैदानावर गेले दोन दिवस सुरू आहे आज शेवटचा तिसरा दिवस असून दोन्ही दिवसाप्रमाणे आजही हे महानाट्य प्रेक्षकांनी हाउसफुल होणार आहे एकूणच महानाट्याने विशाल परब हे नाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.
दरम्यान नारायण राणे कुटुंबीयांवर अनेक वर्ष जिल्हावाशीयांनी भरभरून प्रेम केले आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमीच आहेत त्यामुळे त्यांच्या प्रेरणेतून लवकरच जिल्हा वाशियांसाठी न भूतो न भविष्यती असा सिंधू महोत्सव लवकरच जिल्हा वाशियांसाठी भरवणार असल्याचा शब्द विशाल फाउंडेशन चे सर्वेसर्वा तथा उद्योजक व भाजपा युवा नेते विशाल परब यांनी दिला, येथील शिवगर्जना महानाट्य वेळी उपस्थित शिवप्रेमी व जिल्हा वाशियांना संबोधित करताना ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत, सौभाग्यवती सौ वेदिका विशाल परब मुलगी भार्गवी, मुलगा विराज, अशोक सावंत, दादा साईल,प्रकाश मोर्ये, दीपक नारकर,मोहन सावंत,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
