कणकवलीतील भाजी मार्केटची तयार असलेली इमारत न.पं.ने ताब्यात घ्यावी

ग्लोबल असोशिएटचे भागीदार प्रथमेश राजन तेली यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

⚡कणकवली ता.१८-: कणकवली शहरातील आरक्षण क्र. २६ मधील भाजी मार्केट आम्ही बांधून तयार केले आहे. त्यामुळे ते कणकवली नगरपंचायतीने लवकरात लवकर ताब्यात घ्यावे. कणकवली शहरातील काही भाजीवाल्यांची व फळवाल्यांची गैरसोय होत आहे. ते गरीब लोक आहेत. त्यांचे हातावरचे पोट आहे त्यामुळे त्यांचा धंदा बंद होऊन पोटावर पाय येऊ नये, त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू राहावा यासाठी भाजी मार्केट ची इमारत ताब्यात घ्यावी अशी मागणी या भाजी मार्केट आरक्षणाचे विकासक ग्लोबल असोसिएटचे भागीदार प्रथमेश राजन तेली यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात प्रथमेश तेली यांनी म्हटले आहे की, कणकवली शहर हे स्वच्छ व सुंदर राहिले पाहिजे, नागरिकांची गैरसोय होता नये, असे सर्व गोष्टी लक्षात घेऊन कणकवलीच्या मध्यवर्ती सुसज्य भाजी मार्केट पूर्ण होऊन तयार आहे. त्यामुळे भाजी मार्केट हि इमारत कणकवली नगरपंचायतीने ताब्यात घेऊन लोकांना खूल करावे. तब्बल पाच कोटी किंमत असलेली भाजी मार्केट हि इमारत ग्लोबल असोशिएटस भागीदार प्रथमेश राजन तेली व जागा मालक हे नगरपंचायतला विनामोबदला देत आहेत. तरीही मुख्याधिकारी कणकवली नगरपंचायत यांना आपण आदेश द्यावा कि कोणतीही दिरंगाई न करता भाजी मार्केट ताब्यात घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी तसेच गोर गरीब भाजीवाल्यांना व फळवाल्यांना देखील न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्रथमेश तेली यांनी केली आहे.

You cannot copy content of this page