⚡कणकवली ता.१८-: साळिस्ते येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय मजदूर संघाचे सक्रिय कार्यकर्ते स्व. दिपक गुरव यांच्या स्मृतिदिनानिमित्त 28 मार्चला साळिस्ते येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय मुलांसाठी स्पर्धा, जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा, कामगार मेळावा आणि इतर कार्यक्रम होणार असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दि. 28 मार्चला सकाळी ९ ते १० या वेळेत १६ वर्षाच्या आतील मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा, सकाळी १० ते ११ विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा सत्कार समारंभ, सकाळी ११ ते १ भव्य दिव्य कामगार मेळावा, सायंकाळी ३ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, मंगळवार व बुधवार दिनांक २८ व २९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ठिक ७ वाजता जिल्हास्तरीय भव्य दिव्य शूटिंगबॉल स्पर्धा होणार आहे.
जिल्हास्तरिय शुटींग बॉल स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रु. 7777, उपविजेत्या संघाला रोख रुपये 4444 व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल. तसेच, उत्कृष्ट शुट, उत्कृष्ट डीग यांना पारितोषिके असुन सहभागी सर्व संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी 20 मार्चपर्यंत विजय गुरव, जितेंद्र पाटकर, ओमकार गुरव (सर्व साळिस्ते) यांचेशी संपर्क साधावा.
या सर्व स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन स्व. दिपक गुरव मित्रमंडळ साळिस्ते व भारतीय मजदूर संघ तळेरे प्रभाग यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अशोक जगताप व विजय गुरव यांनी केले आहे.
