माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सहकाऱ्यांसोबत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
⚡सावंतवाडी ता.१७-: भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचा गोवा एअरपोर्ट येथे आगमन झाले असून यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री राणे आज वाढदिवसानिमित्त जिल्हा दौऱ्यावर असून कुडाळ येथे विशाल सेवा फाउंडेशन व भाजप तर्फे शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निलेश राणे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजप मंडळ उपाध्यक्ष गुरु मठकर, तालुका उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर,केतन आजगावकर,मकरंद तोरस्कर समीर पालव,आदी उपस्थित होते.
