पाटेश्र्वर मैदानावर २५ रोजी सत्यनारायण महापूजा

बांदा/प्रतिनिधी
बांदा आळवाडी येथील श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने येथील पाटेश्वर मैदानावर प्रतिवर्षी आयोजित केली जाणारी सत्यनारायण महापूजा यावर्षी २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा, त्यानंतर महाआरती, तीर्थ प्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम, व रात्री पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा महान पौराणिक ‘स्पर्श मणी’ नाट्य प्रयोग सादर होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page