माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.१५-: बांदा येथील प्रस्तावित उड्डाणपूलसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूकडून समान जमिनीचे अधिग्रहण करावे. सद्यस्थितीत एका बाजूनेच अधिक जमीन संपादित करण्यात आल्याने स्टॉलधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही हे काम चालू करू देणार नाही असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी दिला आहे.
यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे देखील लक्ष वेधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बांदा माजी सरपंच अक्रम खान,ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, माजी सदस्य हुसेन मकानदार,आदी उपस्थित होते.
