बावळाट येथे कंटेनर कलंडला…

दुचाकीला बाजू देताना झाला अपघात

*💫बांदा दि.१८-:* सातोळी बावळाट बांदा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना तसेच प्रवाशांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या सुमारास बावळाट गावाच्या हद्दीत दुचाकीला बाजू देताना कन्टेनर रस्त्याच्या साईडला कलटून अपघात झाला. या अपघातात कन्टेनर चालक गुंडाप्होळाप्पा दुंडगी किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बेळगावहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कन्टेनर बावळाट रस्त्यावर दुचाकीला बाजू देत असताना रस्त्याचा अंदाज आल्याने डाव्या बाजूला कलटून अपघात झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली.

You cannot copy content of this page