शिंदे गटातील अनारोजिन लोबो हे नेमके मनाने कुठे…?

योगेश नाईक;अड्ड्यावर बसणाऱ्यांना शिवसेना पदे देत नाहीत;बबनर राणेंवर टीका

⚡सावंतवाडी ता.१४-: अनारोजिन लोबो या शरीराने जरी शिंदे गटात असल्या तरी मनाने कुठे आहेत? हे शोधावं लागेल कारण बरेच वेळ त्या आमच्याशी खाजगीरित्या बोलताना सांगतात माझं नाइलाज आहे, मी तुमच्या सोबतच आहे. असं ते सारखं बोलून दाखवतात,त्यामुळे त्यांच्या नेत्यावर त्याचे प्रेम काय आहे हे दिसून येते अशी टीका ठाकरे युवा सेनेचे तालुका अधिकारी योगेश नाईक यांनी केली.
तर बबन राणे शिवसेनेत असताना त्यांना तालुकाप्रमुख व्हायचं होत पण अड्ड्यावर बसणाऱ्यांना शिवसेनेत पद दिल जात नाही असेही टिका त्यांनी केली.

श्री नाईक यांनी पत्र प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी लोबो आणि राणे यांच्यावर टीका केली आहे, पत्रकात म्हटले की, राणे महिन्यातून दहा वेळा मुंबईवारी कशी कोणाच्या पैश्याने करतात, उपस्थितीत शासकीय कार्यालयामध्ये जाऊन कोणाचे पदाधिकारी तुमच्या हातात हे त्यांनी सांगावे. थोडक्यात कावीळ झालेल्या ना सगळं पिवळं दिसत, रुपेश राऊळ हे शिवसेना पक्षासाठी रक्त सांडलेला शिवसैनिक आहे. लोकांची काम करतात,लोकांवर झालेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवतात म्हणून ते आज समाजात पत ठेवून आहेत. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून मिळालेल्या पद मिळालेल्या राणेनी उगाच कोणा वर पण टीका करू नये.

You cannot copy content of this page