शिवसेना नेत्या अनारोजिन लोबो यांना राष्ट्रवादीच्या दर्शना बाबर देसाई यांचा प्रश्न
सावंतवाडी ता.१४-:
आपली मुलगी पुण्यासारख्या महानगरात जाऊन शिक्षण, उद्योग, व्यापार, राजकारण तसेच समाजकारण यात काम करत कोकणाला नाव लौकिक प्राप्त करून देते, म्हणून ती आपल्याला उपरी किंवा परकी होते का? सिंधुदुर्गातील भूमिपुत्र शिक्षण, उद्योग व्यवसायासाठी बाहेर गेलेत ते सिंधुदुर्गसाठी उपरे झालेत का? असा सवाल दर्शना बाबर देसाई यांनी अनारोजिन लोबो यांना केला आहे. यावेळी त्यांनी परब हे सावंतवाडीसाठी उपरे असतील तर तुमची परके आणि उपरे पणाची व्याख्या काय आहे ती स्पष्ट करावे असे सांगितले आहे.
यावेळी त्या पुढे बोलताना म्हणाल्या को, अनारोजिन लोबो या आता वरिष्ठ झाल्या असून, कदाचित ते जुन्या गोष्टी विसरत असतील तर अर्चना घारे परब यांचे लहानपणी त्याच्या सोबत काढलेले फोटो तसेच त्यांचा जन्म दाखला, मिलाग्रिस शाळेचे आणि राणी पार्वतीदेवी हायस्कूल मधील शाळा सोडल्याचा दाखला त्यांना पाठवून देऊ असा टोला देखील लगावला आहे.
