१०८ यज्ञ कुंडांचा शिवमहायाग गोवा देवभूमी बेती येथे संपन्न

बांदा ता.१४-: गोव्याच्या देवभूमीत बेती गोवा येथे १०८ यज्ञ कुंडांचा शिवमहायाग भक्तीपुर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरू गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून व श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यास यांच्या आयोजनातून करण्यात आला.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे, गोवा राज्य भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार केदार नाईक, पेन्ह दि फ्रान्स सरपंच स्वप्निल चोडणकर, उपसरपंच दिपाली वेर्णेकर, बांदा माजी जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, राजु राऊळ, अध्यक्ष अमीत कोरगावकर, सचीव गिरीधर गावडे आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, अध्यात्म हि सगळ्यात मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपण ज्या भक्तीभावाने स्वामी मार्ग पत्करू तोच भाव आपणाला भविष्यात तारणार आहे. म्हणुन समाजासाठी आपणाला जे काही करता येईल ते आपण केले पाहीजे.
मंत्री रोहन खवंटे म्हणाले, समाजाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी योग्य गुरूची आवश्यकता असते. हाच भक्ती मार्ग गोव्यात रूजविण्यासाठी सदगुरू श्री गावडे काका महाराज यानी घेतलेला पुढाकार आम्हा सर्व गोवावासीयांसाठी मोठा आशिर्वाद आहे. त्यामुळे या अध्यात्मातून समाजाला समृध्द बनविण्यासाठी लागेल ती मदत देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. आपल्या जीवनात एकाच वेळी १०८ यज्ञ कुंडाचा महाशिवयाग प्रत्यक्ष पाहुन सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले असुन हा लोक कल्याणकारी महायाग समस्त गोमांतकीय जनतेच्या आणी देशातील जनतेसाठी कल्याणकारी ठरावा.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी या शिवमहायागाच्या पुर्वसंधेला भेट देऊन श्री स्वामी समर्थाच्या पादुकांचे पुजन केले. २५ देशात प्रसिध्द असलेले केरळ राज्यातील पुरोहीत श्री जीत लंबोदरी व त्यांच्यासोबत असलेल्या पुरोहीतानी मंत्र घोषात हा महाशिवयाग संपन्न केला. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत न भूतो न भविष्यती असा धार्मीक, विधीवत याग संपन्न झाला‌. समाजातील दु:ख, दारीद्र दुर व्हावे व सर्वाना चांगले आरोग्य लाभावे, समृध्दी लाभावी हि प्रार्थना करण्यात आली.
गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील हजारो स्वामी भक्त या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झाले होते. श्री श्री १०८ महंत प. पु. सदगुरू श्री गावडे काका महाराज यानी अम्रुततुल्य असे मार्गदर्शन केले. भक्ती मार्ग हाच खरा मुक्ती मार्ग आहे. श्रध्दा भावना विश्वास जपण्याचे काम आपण सर्वानी केले पाहीजे. देव देवस्कीच्या मागे न लागता अध्यात्म जाणा. दिन दुबळे, ललीत पिडिताना सहकार्य करा. स्वामी सेवेत निरंतर रहा‌. आपणा सर्वाना मिळुन या एक वर्षात या ठिकाणचे सकंल्पीत स्वामी मदिर पुर्ण करायचे आहे. यावेळी या मंदीरासाठी आपल्या स्वमालकीची जमीन दात्रुत्व भावनेने दान देणा-या नाईक मिरसकर कुटुंबीयाचा, पुरोहीत श्री जीत लंबोदरी, जि. प. सदस्या सौ‌ श्वेता कोरगावकर, राजु राऊळ, सौ प्रिती कूशे, विनायक परब (वास्तु विषारद) , एकनाथ गावडे, राजन गावडे, बापु गावकर, सुरेश नारूरकर, बंड्या सावंत याना सन्मानीत करण्यात आले. प्रास्तावीक करून आभार श्री सदगुरू भक्त सेवा न्यासचे सचिव राकेश केसकर यानी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश अवखले, अनुपा पार्सेकर यानी केले.
फोटो :-
गोवा येथे शिवमहा्यागत सहभागी झालेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खवंटे, सद्गुरू गावडे काका महाराज व इतर.

You cannot copy content of this page