विचारातील स्पष्टता हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊलं

मानसोपचार तज्ज्ञ मिनाक्षी अळवणी यांचे प्रतिपादन

⚡दोडामार्ग ता १३-: झोळंबे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन ग्रामपंचायत झोळंबे, प्राथमिक शाळा झोळंबे, माध्यमिक विद्यालय, अंगणवाडी झोळंबे, आरोग्य उपकेंद्र झोळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

निमित्त शाळेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ऐतिहासिक महिलांवर आधारित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.यात सहभागी विद्यार्थिनीनी ‘सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाबाई, राणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, डॉं.आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, यासारख्या व्यक्तिरेखा साकारल्या.
यावेळी महिला सक्षमिकरणाच्या दृष्टीने एक किंवा दोन मुली असलेल्या मातांचा मातृगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. सौ. वैष्णवी विनायक गाडगीळ, सौ. समिक्षा महेंद्र गाळेलकर, सौ. दिक्षा दिलीप घोगळे व सौ. प्रियांका प्रमोद गवस यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थांच्या मातांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून आयोजित या कार्यक्रमात प्रमुख अतिथी मानसोपचार तज्ञ मिनाक्षी अळवणी यांनी महिला सक्षमीकरण व मानसिक आरोग्य या विषयावर किशोरवयीन मुली व त्यांच्या मातांना मार्गदर्शन केले. माझी स्वतःबद्दलची, स्वतःची प्रतिमा काय आहे. मला माझ्या आयुष्यात काय हवे आहे, माइया गरजा काय आहेत, याबाबत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले तसेच आपण सक्षमीकरणाच्या वाटेवर चालणार असू तर आपल्या विचारात स्पष्टता .हवी व आपले विचार योग्य शब्दात मांडता आले पाहिजेत असे विचार या प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी झोळंबेचे उपसरपंच श्री. विनायक गाडगीळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. साक्षी परब , ग्रामपंचायत सदस्या सौ विनिता गवस, सौ. संजना गवस, श्रीम. उज्वला कांबळे, माध्यमिक शाळेचे श्री . काटकर सर, श्री. परब सर, आरोग्य सेवक जेरॉन सोच , आरोग्य सेविका श्रीम. मीरा कुरडे, आशा सेविका सौ. सुप्रिया गवस, अंगणवाडी सेविका सौ. संजना राऊळ व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. साक्षी गवस उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री यशवंत धुरी यांनी केले. तर सूत्रसंचालन शिक्षक श्री .संतोष गवस आणि आभार श्री.विशाल माने यांनी मानले.

You cannot copy content of this page