असलदे उगवतीवाडी येथील गणेश जयंती उत्सव उत्साहात; दिंडी भजने, वारकरी भजनांची रंगत.
*💫कणकवली दि.१७-:* असलदे येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश उत्सव २०२१ व सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कै. सुमती विश्राम लोके यांच्या स्मरणार्थ पत्रकार भगवान लोके यांच्यावतीने आयोजित महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धेत १९ महिलांनी सहभाग घेतला होता. त्यात पैठणीच्या मानकरी भाग्यलक्ष्मी लोके ठरत प्रथम क्रमांक पटकविला तर द्वितीय क्रमांक ऋतुजा जंगले तर तृतीय क्रमांक आशा डगरे या विजेत्या ठरल्या. या स्पर्धेत प्रथम विजेत्या भाग्यलक्ष्मी लोके यांनी ही पैठणी स्वत:ला न ठेवता सहभागी महिलांमधील नावाच्या चिठ्ठया उडवत देण्याचे ठरवले, त्यानुसार चिठ्ठी विजेत्या विना जेठे ती पैठणी सौ. लोके यांच्या हस्ते देण्यात आली. या गणेश जयंती निमित्त आयोजित दिंडी भजने, वारकरी भजनांची रंगत पहाटे पर्यंत रंगली होती.
असलदे उगवतीवाडी येथील गणेश मंदिरात हे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले त्यामध्ये गणेश पुजन, सामुहिक अभिषेक, सत्यनारायणाची पुजा, महाआरती, महाप्रसाद,महिलांसाठी हळदीकुंकु, होममिनिस्टर स्पर्धा, लहान मुलांचे, रेकॉर्ड डान्स, दिंडी भजने, वारकरी भजने असे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या ठिकाणी कणकवली मुंबई येथील उद्योजक शेखर सोनार, सभापती मनोज रावराणे , माजी सभापती संतोष कानडे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, सोसायटी चेअरमन प्रकाश परब, आयनल सरपंच बापू फाटक, साई ओटवकर, व्यापारी चंदू मोरये यांच्यासह मान्यवरांनी श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री गणेशाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान, होममिनिस्टर स्पर्धेत १९ महिलांनी सहभाग घेतला या स्पर्धेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ सरपंच पंढरीनाथ वायंगणकर यांच्या हस्ते करण्यात आला. वेगवेगळ्या पाच फे-यांमध्ये ही स्पर्धा सुप्रसिध्द निवेदक पत्रकार उमेश परब यांनी घेतली. गुणलेखन व परिक्षक रसिका आचरेकर , आणि माधुरी डगरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या विजेत्यांना बाळा लोके, संदेश आचरेकर, नारायण जेठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी अध्यक्ष भगवान लोके, उपाध्यक्ष लक्ष्मण लोके, खजिनदार प्रदीप हरमलकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत जेठे, गणेश लोके, विजय आचरेकर, महेश लोके,रामचंद्र जेठे, प्रकाश आचरेकर,सुरेश डगरे, सचिन लोके,उमेश परब, भिवा हरमलकर, विशाल जेठे,दिवाकर डगरे,दयानंद डगरे आदींसह सहभागी महिला उपस्थित होत्या.