वीजबिलासंदर्भात मनसे मालवणची उद्या बैठक

जिल्हा आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी होणार बैठक : सांडव, गिरकर

मालवण : वीजबिलासंदर्भात मनसे मालवणची बैठक सोमवारी सकाळी ११.०० वाजता मनसे तालुका सचिव विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे तालुका अध्यक्ष विनोद सांडव व विल्सन गिरकर यांनी स्पष्ट केले. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे जिल्हा आंदोलनाची रूपरेषा ठरविण्याबाबत सर्व तालुका अध्यक्षांनी सोमवार २३ नोव्हेंबर रोजी आपल्या तालुक्यामध्ये बैठक आयोजित करावी. या बैठकीमध्ये वीजबिलासंदर्भात जिल्हास्तरावर काढण्यात येणाºया मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत सामान्य जतनेलाही सहभागी करण्याबाबत नियोजन करण्यात यावे, असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले होते. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाºया विजबिलावर मालवण तालुका मनसेने गंभीर दखल घेतली आहे. तरी सर्व उपतालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष, विद्यार्थी सेना, महिला आघाडी तसेच आजी-माजी महाराष्ट्र सैनिकांनी उद्या सामेवारी २३ नोव्हेंबर रोजी रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष विनोद सांडव व तालुका सचिव विल्सन गिरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page