दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी रामगड किल्ल्यावर शिवजयंती

⚡मालवण ता.०९-:दुर्गवीर प्रतिष्ठाच्या वतीने होणाऱ्या सातत्यपूर्ण संवर्धन मोहिमा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून किल्ले रामगड झाडीझुडपातून मोकळा श्वास घेत आहे. गड दिसू लागल्याने गडावर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गडप्रेमींना गड समजावा यासाठी शिवजयंती चे औचित्य साधुन शुक्रवार दहा मार्च रोजी वास्तूफलक आणि हिंदवी स्वराज्याच प्रतीक असलेला भगवा या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने गडावर लावला जाणार आहे.

तरी या सोहळ्यास सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहाण्याचे आवाहन दुर्गविर प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page