⚡मालवण ता.०९-: आचरा येथील सिंहगर्जना ग्रुप आणि यशराज प्रेरणा संस्थेच्या वतीने शुक्रवार १० मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता आचरा तिठा येथे तिथिनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराजांच्या मूर्तीचे पूजन, पोवाडा सादरीकरण तसेच रामेश्वर मंदिरकडून आचरा तिठापर्यंत वाहन फेरी तसेच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमास शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
