माझे कुटुंब, माझी जबाबदारी ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करा…

अँड. परिमल नाईक यांचे आवाहन

*💫सावंतवाडी दि.१७-:* राज्यात पुन्हा कोरोना संक्रमीत रुग्णांत वाढ होत आहे. तरी, आपण सर्वांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करा, असे आवाहन नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी केले आहे. नाईक म्हणाले, आपल्या अवतीभवती असलेल्या कित्येक चांगल्या व जीवास जीव देणा-या व्यक्तींना ह्या दुष्ट कोरोनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्यातुन हिरावुन नेले आहे.‌ त्यामुळे आपण सर्वांनीच पुर्वी पेक्षा अधिक काळजी घेऊनच सार्वजनिक जीवनात वागले पाहिजे. त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. जान है तो जहान है म्हणुन कृपया आपण योग्य ती काळजी घेऊनच आपला सार्वजनिक वावर करावा. घरातुन बाहेर पडताना मास्क लावा, बाहेरुन आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुवा आवश्यक त्यावेळी सॅनिटायझरचा वापर करा, असा सल्लाही त्यांनी दिला. मला काहीच होणार नाही, मी तंदुरुस्त व सुदृढ आहे, माझी रोग प्रतिकार शक्ती खुपचं सशक्त आहे, अशा भ्रमात कृपया राहु नका. स्वतःसाठी नाही निदान आपल्या कुटुंबासाठी।तरी आपली काळजी घ्या, असेही नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page