एकास किरकोळ दुखापत*
* सावंतवाडी :सावंतवाडी बाजारपेठेच्या दिशेने जात असलेल्या खाजगी स्कूल बसचा पान टपरीच्या पत्र्याला धक्का लागून टपरीचा पत्रा कोसळला. यावेळी तेथे बाजूला असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज दुपारी २.३०च्या सुमारास सावंतवाडी विठ्ठल मंदिर नजीक घडली. यात चहा टपरीचे नुकसान झाले.
