सावंतवाडी दि.१७-:* हरमल खालचावाडा येथील जागृत देवस्थान श्री देव सिमरेश्वर देवस्थानचा वार्षिक उत्सव शनिवार २० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमीत्त सकाळी ८ वाजता लघुरुद्र, श्रींची महापूजा, सग्रहमख, रक्षाकवच, अनुष्ठान, दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ९ वाजता पाहुणी कार्यक्रम व त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव सिमरेश्वर देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे
हरमल येथील सिमरेश्वर देवस्थानचा २० रोजी वार्षिक उत्सव…
