राजकारणात येण्यासाठी वेड आणि अंगात रग असावी लागते….

निलेश राणे; २०२४ च्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही…

मालवण (प्रतिनिधी)

राजकारण हे सोपे नाही, राजकारणात येण्यासाठी वेड आणि अंगात रग असावी लागते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या विचाराने युवकांनी राजकारणात यावे. युवकांचे रक्त गरम आहे ते गरमचं ठेवून आक्रमकपणे काम करावे, आपण युवकांच्या पाठीशी कायम उभे राहू, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण येथे युवक संवाद मेळाव्यात बोलताना केले.

भाजप युवा मोर्चा मालवण शहराच्या वतीने मालवण येथील दैवज्ञ भवन येथे युवक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, उद्योजक दीपक परब, विजय केनवडेकर, तालुका खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष राजन गावकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहराध्यक्ष ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, निशय पालेकर, राकेश सावंत आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी भाजयुमो मालवण शहरच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी ललित चव्हाण यांनी प्रास्ताविक करत मेळाव्याच्या आयोजनाची उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी सौरभ ताम्हणकर, धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, दत्ता सामंत यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी निलेश राणे म्हणाले, युवकांनी बोलायला आणि प्रश्न मांडायला शिकले पाहिजे, भाजपात प्रत्येकाला काम करण्याची संधी आहे. युवकांनी आपापल्या भागातील प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतः राजकारणात काम करण्याची रग असल्यामुळेच आलो. दोन वेळा हरलो तरी २०२४ च्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना पाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आमदार नाईक गेल्या दहा वर्षात येथील जनतेची कामे करू शकले नाहीत, एक महोत्सव करू शकले नाहीत. येत्या काळात आपण स्वतः स्व:खर्चातून मालवणात महोत्सव आयोजित करणार, येथील जनता जी कामे सांगेल ती करणार. मालवण नगरपालिका निवडणुकीतही भाजपाचीच सतत येणार, यावेळी कोणताही दगाफटका होणार नाही, २०२४ साली गुलाल आणि फटाके भाजपचेच फुटणार असेही निलेश राणे म्हणाले. सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले.

You cannot copy content of this page