सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र- विभाग सिंधुदूर्ग सावंतवाडी, मळगावचा उपक्रम
ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्यावतीने आयोजकांचा सन्मान
*💫सावंतवाडी दि.२२ सहदेव राऊळ-:* मळगाव येथे प्रथमच सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र- विभाग सिंधुदूर्ग सावंतवाडी, मळगावच्यावतीने भरविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींच्या प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्यावतीने आयोजकांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे राष्ट्रीय सहसचिव मोहम्मद शैख, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भुषण मांजरेकर, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे सिंधुदुर्ग उप जिल्हाध्यक्ष रतीश साटम, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट कोल्हापुर उप जिल्हाध्यक्ष महेश नंदे, स्वराज्य संस्था कोल्हापुरचे योगेश पवार, पत्रकार सागर चव्हाण, सामजिक कार्यकर्ते रुपेश पावसकर, अब्दुल शैख, पत्रकार समीर कदम, पत्रकार दीपक गावकर, सामाजिक कार्यकर्त्या धनश्री गावकर, मळगाव येथील ज्येष्ठ नागरिक मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर, वाळके आणि गोगटे महाविद्यालयाचे प्राद्यापक शरद शिरोडकर, मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे मुख्याध्यापक वैजनाथ देवण, सत्कार मुर्ती सुनील राऊळ, सुधीर राऊळ, रितेश राऊळ, ज्ञानेश्वर राणे, निलेश नाटेकर, चैतन्य नाटेकर, मनिष नाटेकर, शुभम खडपकर, प्रज्योत खडपकर, शुभम देऊलकर, विधी राऊळ, समृधी राऊळ, प्रथमेश राणे, सक्षम वाडकर, पृथ्वीराज बाबर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडून सह्याद्री प्रतिष्ठानने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. हे प्रदर्शन १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत मळगाव येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात साकारण्यात आलेल्या गड किल्ल्यांच्या प्रतिकृती ह्या मराठ्यांच्या जाज्वल इतिहासाची आठवण करून देत होत्या. या प्रदर्शनात मनोहरगड, सिंधुदूर्गकिल्ला, मनसंतोषगड, सर्जेकोटगड, रांगणागड, भरतगड, रामगड, पारगड, हनुमंतगड, विजयदुर्गकिल्ला, देवगडकिल्ला आदी गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनासाठी विशेष मेहनत घेतलेल्या आयोजक सुनील राऊळ, सुधीर राऊळ, रितेश राऊळ, ज्ञानेश्वर राणे, निलेश नाटेकर, चैतन्य नाटेकर, मनिष नाटेकर, शुभम खडपकर, प्रज्योत खडपकर, शुभम देऊलकर, विधी राऊळ, समृधी राऊळ, प्रथमेश राणे, सक्षम वाडकर, पृथ्वीराज बाबर आदी मावळ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.