कुंभवडे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

⚡सावंतवाडी ता.०२-: काजु बागेत कामाला जातांना कुंभवडे येथील जंगलात गवारेड्याने हल्ल्या केल्याने महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार येथे सकाळी साडेआठ वाजता घडला.भारती भरत गावडे (40) रा. कुंभवडे असे तिचे नाव आहे. तिला उपचाराकरिता ओरस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कुंभवडे येथील भारती गावडे हिच्यासह अन्य काही महिला काजु बागेत कामासाठी जात होत्या आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात भारती गावडे या एकट्याच पुढे जंगलातील वाटेने त्या चालत असताना अचानक गव्या रेड्याने तिच्यावर हल्ला केला या हल्ल्यात तिचे डोके नजीकच्या झाडाला आढळल्याने गंभीर दुखापत झाली. तिच्या छातीला व पायालाही दुखापत झाली. या चोरी मागे भारती गावडे याची बॅग वाटेत पडलेली दिसल्याने मागून कामाला जाणाऱ्या महिला व पुरुषांना संशयाला त्यांनी आजूबाजूला पाहिला असता झाडाच्या खाली गावडे या जखमी अवस्थेत दिसून आले आपल्याला गवारड्याने मारहाण केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले लागलीच आणि याबाबतची कल्पना ग्रामस्थांना व वन विभागाला दिली. गव्याच्या हल्ल्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ही हरवले आहे, ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिकच्या मदतीने तिला उपचारासाठी तात्काळ आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हरवले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणि तेथून जिल्हा रुग्णालयात तिला हलविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले.
यासंदर्भात उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांना विचारले असता झालेला प्रकार हा दोडामार्ग वनविभागातील परिसरात येतो. घटनेची माहिती कळतच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली तसेच संबंधित महिलेच्या उपचारासाठी ही त्यांनी सहकार्य केले वनविभागाकडून उपचारासाठी आवश्यक तो खर्च उचलण्यात येणार आहे याशिवाय पंचनामा करून अन्य काही मदत देता येईल का या संदर्भातही वनविभागाचे सहकार्य राहील असे स्पष्ट केले. दरम्यान चौकुळ परिसरात गव्यारेड्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे याआधी चौकुळ केगदवाडी येथील वृद्ध सोनू परब हे नोव्हेंबर महिन्यात गव्या रेड्याकडून झालेल्या हल्ल्यात मयत झाले होते. गंभीरित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.वन्य प्राण्यांकडून या परिसरात मनुष्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना वन विभागाकडून मात्र सुरक्षितेच्या दृष्टीने काहीच हालचाली होताना दिसत नाही यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडूनही वन विभागाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page