रुपेश राऊळ; ठाकरे गटाच्या शिस्तमंडळाने घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट..
सावंतवाडी ता.०१-: जो पर्यंत लोकप्रतिनिधी नवीन बाॅडी नगरपालिकेवर बसत नाय तो पर्यत घरपट्टी,पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय घेऊ नये त्याला तात्काळ स्थगिती देण्यात यावी आशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.याबाबत त्यांनी आज ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांसमावेत त्यानी नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेते चर्च करून ही मागणी केली आहे.
यावेळी रुपेश राऊळ बोलताना पुढे म्हणाले की इथलं प्रशासन नक्की काय बघतय सावंतवाडीचे विकास किंवा इथल्या सुविधा जी भविष्याची वाटचाल काय आहे ती नक्की जनतेपर्यंत गेली पाहिजे त्याच्यासाठी येत्या दोन महिन्यात निवडणुका लागतील त्यामुळे या कर वाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा,बाळा गावडे, जयंत परूळेकर, शब्बीर मणियार, श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते.
