आजगाव-धाकोरे येथील आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत

वातावरणातील सततच्या बदलामुळे आंबा पिकावर दुष्परिणाम

⚡सावंतवाडी ता.१६-: तालुक्यातील आजगाव-धाकोरे (वसवाचे तळे) येथील आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वातावरणातील सततच्या बदलामुळे आंबा फळावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाला आहे. हाता तोंडाशी आलेलं आंबा पीक वातावरणातील अती उष्णतेमुळे वाया गेल आहे. यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.
आधीच कर्ज काढून आंबा बागायतीची देखभाल, औषध फवारणी केली असून अचानक झालेल्या या हवामानातील बदलामुळे येथील बागायतदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आजगाव- धाकोरे, वसवाचे तळे येथील प्रगतशिर शेतकरी तथा आंबा बागायतदार महादेव अर्जुन कापडी तसेच गावातील आंबा बागायतदार सध्या या अचानक झालेल्या आंबा फळांवरील दुष्परिणामामुळे मोठ्या हवालदिल झाले आहेत. आंबा पिकावर पांढरे, काळे डाग पडत असल्याने पिकाचे नुकसान होत आहे. शासनस्तरावरून लवकरात लवकर या शेतकरी आंबा बागायतारांना मदतीचा हात देऊन त्यांचे होत असलेले नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे. येथील शेतकरी महादेव कापडी यांनी बगायतीच्या झालेल्या नुकसानाबाबत कृषी सहाय्यक गवंडे यांच्याशी संपर्क साधून याची कल्पना देताच गवंडे यांनी तात्काळ जाऊन नुकसान झालेल्या बागेची पाहणी केली. यावेळीआपण वरिष्ठांना या बाबत माहिती दिली असून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊन शासन स्तरावर मिळणारी मदत देण्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page