महाबळेश्वर येथे पार पडली स्पर्धा;माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले अभिनंदन…
⚡सावंतवाडी ता.१२-: महाबळेश्वर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडी नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावून सावंतवाडीचे नाव राज्यात झळकविले. या स्पर्धेत राज्यातील सर्व नगरपरिषदेने सहभाग दर्शविला होता. यात सावंतवाडी नगरपरिषद अव्वल ठरली.
दरम्यान माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सर्व खेळाडूंचं फोन द्वारे अभिनंदन केले.
