मनसेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

८५ हुन अधिक जणांनी घेतला शिबिराचा लाभ

⚡देवगड ता.१२-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना तोरसोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना चिटणीस श्री संतोषभाऊ शिंगाडे आयोजित, मनसे शाखा अध्यक्ष श्री राजन पवार आणि सहकारी यांच्या मेहनतीने आज डॉक्टर रघुनाथ गावडे यातर्फे”भव्य आरोग्य शिबीर” तोरसोळे गावात पार पडले.


समस्त गावकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी व शालेय मुख्याध्यापक श्री वाडकर सर आणि इतर सहकारी यांच्या सहकार्याने आज आरोग्य शिबीर आयोजन केले गेले, सुमारे ८५ हुन अधिक जणांनी सदर शिबिरास उपस्थिती दर्शवून शिबीराचा लाभ घेतला, सदर ठिकाणी आरोग्याशी निगडित उपचार करून अल्प दरात औषध वाटप सुद्धा करण्यात आले.
सदर उपक्रमास मनसे चित्रपट सेना चिटणीस संतोषभाऊ शिंगाडे समवेत सन्माननिय. तालुका अध्यक्ष चंदनजी मेस्त्री आणि सहकारी परेश आडकर यांनी भेट दिली, सदर ठिकाणी श्री राजन पवार, प्रथमेश पवार, कल्पेश प्रशांत कदम, सचिन राणे, सूयेश पवार ,आशिष पवार,राजेंद्र पवार ,आयुष पवार,सोहम पवार ,कुणाल इंगळे,संदीप कदम ,गोरक्षनाथ पवार, ओमकार पवार, सौ. छाया माने, आणि अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. सदर उपक्रम आयोजित केल्याबद्दल तोरसोळे गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे कार्यकर्ते यांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page