वामनराव महाडिक हायस्कूलमध्ये विनायक दळवी यांचे नेमबाजी शिबीर

⚡कणकवली ता.१२-: तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दळवी महाविद्यालयाचे माजी मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी, यांनी विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण दिले. यावेळी प्राचार्य,अविनाश मांजरेकर हे उपस्थित होते.
विनायक दळवी यांनी वामनराव महाडिक हायस्कूल मधील एनसीसीच्या कॅडेट्सला व इतर विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण दिले . दळवी एनसीसीचे ‘सी’ सर्टिफिकेट पास आहेत. रायफल शुटींग संघटनेचे अठराव्या वर्षापासून अजीवन सभासद आहेत. महाविद्यालयात नेमबाजीचे अंतर-महाविद्यालयीन,अंतर-विद्यापीठीय, स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे म्हणून विशेष पुढाकार त्यांनी घेतला होता. मुलांमध्ये नेमबाजीची आवड निर्माण करणे, त्यांना तंत्रशुद्ध शिक्षण देऊन,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा साठी तयार करणे, हा उद्देश या मागे होता.

नेमबाज हा मानसिकरित्या कणखर असणं गरजेचं असतं. रायफलचे प्रकार ,रायफल कशी पकडतात, इथ पासून चालवण्याच्या पद्धती, रायफल शूटिंग करतांना घ्यावयाची काळजी इत्यादी महत्वाच्या गोष्टींची माहिती दळवी सरांनी हसत-खेळत सांगून,विद्यार्थ्यांकडून याचा सराव करून घेतला.
नेमबाजी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्रा.अविनाश मांजरेकर म्हणाले कि, दळवीसरांसारख्या आधुनिक भगीरथांनी शिक्षणाची गंगा या गावा पर्यंत आणली त्यासाठी त्यांना फार कष्ट सोसावे लागले”.
यावेळी वामनराव महाडिक हायस्कूलचे शारीरिक शिक्षक तडवी एन.बी, प्रा.ए.बी. कानकेकर,एनसीसीचे कॅडेट्स,इतर विद्यार्थी व दळवी महाविद्यालयाचे नरेश पटकारे,निनाद दानी, नितीश गुरव,नरेश शेटये,चेतन नेमन व प्रशांत हाटकर हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page