⚡वेंगुर्ला ता.१३-: शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा २० वा वर्धापन दिन सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी ८ वा. लघुरुद्र, सकाळी ९ वा. वरदशंकर महापूजा, दुपारी १२ वा. आरती व तीर्थप्रसाद आणि दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ यावेळेत भाविकांची भजने, सायं ७ ते ८ श्रींची पालखी, रात्रौ ८ ते ९ सत्कार व बक्षिस वितरण समारंभ आणि रात्रौ १० वा. जय हनुमान दशावतार मंडळाचा दणदणीत दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
