ना. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा

हजारो रुपयांची पारितोषिके;आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

⚡कणकवली ता.११-: आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्गच्यावतीने शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या रूपाने हजारो रुपयांची पारितोषिके स्पर्धकांना दिली जाणार आहेत.

निबंध स्पर्धा – पहिला गट पाचवी ते सातवी गटासाठी माझा जिल्हा माझा अभिमान, माझा आवडता नेता, छत्रपती शिवाजी महाराज एक आराध्यक्ष दैवत, टीव्ही / मोबाईल फोन शाप की वरदान, मला आवडलेली पुस्तके असे विषय असून शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. यासाठी अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार प्रत्येकी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ ३ हजारचे पारितोषीक देण्यात येणार आहे.

दुसरा गट आठवी ते दहावीसाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, माझा भारत- समर्थ भारत सशक्त भारत, संस्कार आणि विद्यार्थी, चला विज्ञानवादी होऊया, मी कोण होणार व का?, युवाशक्ती आणि भारत हे विषय आहेत. यासाठी शब्दमर्यादा ८०० शब्दांची असून त्यासाठी अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजारची पारितोषीके तसेच प्रत्येकी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्या येणार आहे. तर उत्तेजनार्थ ३ हजारचे पारितोषीक असणार आहे.

तिसरा गट महाविद्यालयीन व खुला असून यासाठी भारत महासत्तेच्या दिशेने, जी-२० आणि भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुशासनाची ८ वर्षे, एमएसएम विभाग व्याप्ती आणि विस्तार, चला उद्योजक बनुया, छत्रपती शिवराय वैशिष्ठ आणि विचार, सिंधुदुर्ग जिल्हयाच्या विकासाच्या पुढील दिशा हे विषय असून यासाठी १ हजार शब्दांची मर्यादा आहे. यात अनुक्रमे २५ हजार, १५ हजार १० हजार तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ ५ हजारचे पारितोषी देण्यात येणार आहे.

हे निबंध लिखीत व मुद्रीत अशा दोन प्रतित १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत संज परब यांचे कार्यालय सावंतवाडी, निलेश कडावलकर बजाज शोरूम कुडाळ, विवेक सावंत, नारायण राणे संपर्क कार्यालय कणकवली, आमदार नितेश राणे संपर्क कार्यालय देवगड, चैतन्य नर्सिंग होम तळेरे, रवी मालवणकर मालवण, संजय पाटील वेंगुर्ले येथे द्यावीत. स्पर्धचे बक्षिस वितरण १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कणकवली येथे करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मिलींद कुलकर्णी व अण्णा कोदे ९४२२३८१९०० येथे संपर्क साधावा

वक्तृत्व स्पर्धा पहिला गट इयत्ता सातवी ते दहावी असून यात महाराष्ट्रा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, माझा देश महासत्ता होणार, स्वामी विवेकानंद एक योद्धा संन्याशी, स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड, आणि चला विज्ञानवादी होऊया असे विषय आहेत. यासाठी अनुक्रमे १५ हजार, १० हजार हजार तसेच प्रत्येकी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ ३ हजार पारितोषीक देण्यात येणार आहे.

महाविद्यालयीन गट अकरावी ते सिनिअर कॉलेजचा असून यात भारत महासत्तेच्या दिशेने, जी-२० आणि भारत एक नविन प्रारंभ, बुद्धीवादी विज्ञानवादी सावरकर, सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दिशा, देश महासत्ता होताना युवकांचे योगदान व त्यांच्या अपेक्षा, माझा देश बदलतोय घडतोय झेपावतोय, छत्रपती शिवराय वेगळेपण आणि द्रष्टेपण असे विषय असून यासाठी २५ हजार, १५ हजार १० हजार तसेच प्रत्येकी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ ५ हजार पारितोषीक देण्यात येणार आहे.
सदरची वक्तृत्व स्पर्धा १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. वासुदेवानंद सरस्वती हॉल उद्यमनगर कुडाळ येथे होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयास जास्तीत जास्त दोन स्पर्धक पाठवता येतील. नावनोंदणी १६ फेब्रूवारीपर्यंत करावयाची असून अधिक माहितीसाठी डॉ. मिलींद कुलकर्णी, अण्णा कोदे, विवेक सावंत ९७६४५४०७३७ यांच्याशी संपर्क साधावा.

चित्रकला स्पर्धा पहिला गट सातवी ते दहावी गटासाठी शिवजन्म प्रसंग, स्वराज्याची शपथ, माझा निसर्गरम्य सिंधुदुर्ग, आझादी का अमृत महोत्सव हे विषय असून यासाठी अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार व प्रत्येकी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ एक हजारची आठ पारितोषीके देण्यात येणार आहेत.

दुसरा महाविद्यालयीन गट असून यात अकरावी ते १५ वीपर्यंतचा समावेश आहे. यात सिंधुदुर्ग किल्ला उभारणी व शिवराय, जी-२० जागतिक विश्वगुरू बनण्याच्यादृष्टीने भारताची वाटचाल, २०३० मधील माझा भारत, स्वच्छ भारत अभियान असे विषय असून यासाठी अनुक्रमे १५ हजार, ११ हजार, ७ हजार व प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच २ हजारची आठ उत्तेजनार्थ पारितोषीक देण्यात येणार आहेत.

खुला गटासाठी आरमार व शिवराय, शिवराय व स्वामीनिष्ठ मावळे यांच्यावर आधारित कोणतेही प्रसंगचित्र, माझ्या स्वप्नातील सिंधुदुर्ग सी वर्ल्ड, आत्मनिर्भर भारत हे विषय आहेत. यासाठी अनुक्रमे २५ हजार, २० हजार व १५ हजारची पारितोषीके तसेच प्रत्येकी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धा १८ फेब्रुवारी रोजी १० ते दु. १ यावेळेत प्रत्येक तालुक्यात होणार आहे. यासाठी नावनोंदणी १२ फेब्रुवारीपर्यंत करावयाची आहे. शालेय व महाविद्यालयीन गट स्पर्धा प्रत्येक तालुक्यात तर खुल्या गटासाठीची वैभववाडी देवगड व कणकवलीसाठी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले मालवणसाठी टोपीवाला हायस्कूल मालवण तर सावंतवाडी, दोडामार्गसाठी मळगांव इंग्लिश स्कूल येथे स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी कणकवली प्रसाद राणे- ९४२२३७४१२७, वैभववाडी मंदार चोरगे ९७६७२२२२४८, देवगड राजेंद्र कोयंडे ९५४५३६३९७१, कुडाळ संदीप चिऊलकर ८४०८९४०४१३, मालवण बी. जी. सामंत ९४२३३०२३९६, वेंगुर्ले समीर पेडणेकर ९४२०२५९०१२, सावंतवाडी प्रकाश केसरकर ९५७९८३२०६९, दोडामार्ग भगवान नागरगोजे ८९७५२४४६९४ येथे संपर्क साधावा. या स्पर्धेचे बक्षिस वितरण १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ७ वा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.

You cannot copy content of this page