निरवडे गावातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज करणार ठाकरे सेनेत प्रवेश

रुपेश राऊळ यांची माहिती;खा विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बांधणार शिवबंधन

⚡सावंतवाडी ता.११-: येथील निरवडे गावातील भाजप कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली आहे.

दरम्यान हा पक्षप्रवेश शिवसेना खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख दूध दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हा पक्षप्रवेश आज सायंकाळी 5.30 वा. मळगाव रेल्वे स्टेशन समोरील हॉलमध्ये होणार आहे. तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ही रुपेश राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page