लहान गटात श्रेया चांदोरकर तर मोठ्या गटात प्रसाद खोरागडे प्रथम*
*💫सावंतवाडी दि.१४-:* सिंधू आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर नगराध्यक्ष संजू परब यांनी ही स्पर्धा दोन गटात घेण्याचे ठरवून काल जाहीर केले होते. त्या प्रमाणे या स्पर्धेच्या पहिल्या लहान गटात ( ५ वी ते ७ वी) प्रथम क्रमांक श्रेया चांदोरकर यांनी पटकावला असून, द्वितीय क्रमांक आयुष पाटणकर यांनी पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक धनंदा फाले यांनी पटकावला आहे. तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके जयराम राऊळ आणि अथर्व सावंत यांनी पटकावला आहे. तर मोठ्या गटात ( ८ वी ते १० वी) प्रथम क्रमांक प्रसाद खोरागडे यांनी पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक रोहित ठाकर यांनी पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक सायली बहिरे यांनी पटकावला आहे. तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके पूर्वा चांदेकर आणि पुर्वा धाकोरकर यांनी पटकावला आहे. या स्पर्धेचे परीक्षण दादा मालवणकर यांनी केले होते. भाजप प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधू आत्मनिर्भर योजनेचे संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक अँड परिमल नाईक, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर , नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, नगरसेविका उत्कर्ष सासोलकर , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
