कालसे अपघात प्रकरणी डंपर चालकावर कडक कारवाई करा

ग्रामस्थांसमवेत आ नाईक यांची मागणी

⚡मालवण ता.१०-: काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच डंपरची कागदपत्रे तपासण्यास सांगितले. या अपघातात डंपरखाली सापडून काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी काळसेकर या मृत्युमुखी पडल्याने आ. वैभव नाईक यांनी दुःख व्यक्त करत काळसेकर कुटुंबियांचे सांत्वन केले. त्याचबरॊबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधत अपघात स्थळी स्पीड ब्रेकर बसविण्याचे निर्देश दिले.

काळसे होबळीचा माळ येथे गुरुवारी भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने शेतातून काम करून घरी परतत असलेल्या पाच महिलांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत डंपरखाली सापडून रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात रुक्मिणी यांच्या सोबत पादचारी अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या होत्या

आज आमदार वैभव नाईक यांनी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा केली यावेळी हरी खोबरेकर,मंदार केणी, बाबी जोगी, तपस्वी मयेकर व काळसे ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page