*💫वैभववाडी दि.१४-:* श्री कुर्लादेवी मंदिर कुर्ली वडाचे भरड येथे 16 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात येणार आहे .या हरिनाम सप्ताह निमित्त 7 दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.16 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री कुर्लादेवी जुने मंदिर ते श्री कुर्लादेवी नवीन मंदिर अशी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय व गावातील भाविकांची हरी नाम टाळ, मृदुंगाच्या घोषात भव्य वारकरी दिंडी काढण्यात येणार आहे.दार दिवशी स्थानिक गावातील भजने पारंपरिक पद्धतीने 16 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहेत.त्याच प्रमाणे इतर बाहेरील गावातून भजने व सांस्कृतिक ज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम श्री कुर्लादेवी देवस्थान उपसमिती,कुर्ली, देवस्थान चे मानकरी,बारा पाच व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम करतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करन राबविण्यात येणार आहेत. दैनंदिन धार्मिक कार्यक्रम साधेपणाने पार पाडण्यात येणार आहेत.मास्क व सॅनिटायझर इत्यादी चा वापर करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी , कोल्हापूर यांच्या आदेशानुसार व शासकीय नियमांचे पालन करून हरिनाम सप्ताह साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे ,असे आवाहन कुर्ली देवस्थान उपसमिती,देवस्थान चे मानकरी, बारा पाच व कुर्ली ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. फोटो:श्री कुर्लादेवी चा घेणे
कुर्लादेवी मंदिरात 16 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह…
