*💫बांदा दि.१४-:* सटमटवाडी सिमा तपासणी नाका बांदा येथे अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे सांबर गंभीर जखमी झाले. हा प्रकार रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिकांनी सांबराला वनविभागाच्या ताब्यात दिले. हे सांबर रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेले होते. वनविभागाने प्राथमिक उपचार करुन सायंकाळी नैसगिक अधिवासात सोडण्यात आले, अशी माहिती बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी दिली आहे. सदर सांबर एका वर्षाचे होते.
उपचारानंतर संबराला सोडले नैसगिक अधिवासात…
