राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून कणकवलीत विश्वविक्रमी उपक्रम

१००० पालक व विद्यार्थी संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच वेळी वाजविणार

⚡कणकवली ता.१०-: ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमस्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी कणकवली येथे विश्वविक्रम उपक्रम घेण्याचे योजले आहे.यामध्ये १००० पालक व विद्यार्थी यांचा संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच वेळी वाजवण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


या वाद्यामध्ये ( ढोल, ताशा, तबला , पेटी, ढोलक, मृदुंग, टाळ, हलगी, दिमडी, ई. वाद्यांचा समावेश आहे.) व त्याचबरोबर उर्वरित विद्यार्थी डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती तयार करून एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत.या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होईल व यासाठी सर्व सहभागी स्पर्धकांना वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र दिले जाईल.तरी या उपक्रमात सर्व शाळेच्या शिक्षकांनी,विद्ध्यार्थ्यानी व पालकांनी याची नोंद घेऊन यामध्ये जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा असे आवाहन आयडियल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.या उपक्रमातील सहभागासाठी व अधिक माहितीसाठी ८६०५०५५०७६,७६६६४९५८७०
नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page