मृतदेह प्रकरणी भेट देत घेतली माहिती
आंबोली,ता.२: येथील पोलीस स्थानकात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी भेट दिली.आंबोली घाटात कराड येथील मृतदेह आणून टाकत असताना आणखी एक जण पडण्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने घाटातील स्पॉट ची पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे,हवालदार दत्ता देसाई,अभिजित कांबळे,राजेश नाईक,दीपक शिंदे आदी उपस्थित होते.दरम्यान आंबोली येथील खून करून मृतदेह टाकल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे याना विचारले असता ते म्हणाले,या प्रकरणी आरोपी अटकेत आहे पुढील तपास सुरू आहे.
