बांदा/प्रतिनिधी
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गट भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाल्याने बांदा भाजपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, सावंतवाडी तालुका संयोजक तथा माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, मंडल अध्यक्ष महेश धुरी, सिद्धेश महाजन, प्रवीण देसाई, वाफोली उपसरपंच विनेश गवस, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, आत्माराम गावडे, अंकुश जाधव, शामराव सावंत,संदीप बांदेकर, गुरु धारगळकर, आत्माराम बांदेकर आदिसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाने बांद्यात भाजपचा जल्लोष…
