साळिस्ते नं.१ येथे कामगार व त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी

⚡कणकवली ता.०२-: भारतीय मजदूर संघाच्या नेतूत्वाखाली जिल्हा परिषद केंद्र शाळा साळिस्ते नं.१ येथे नोंदणीकृत सभासद कामगार व त्यांच्या कुटुंबाची तालुकास्तरीय आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी संघाच्या सभासदांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 या कार्यक्रमाचा प्रारंभ भारतीय मजदुर संघ साळिस्ते गाव अध्यक्ष संतोष पाष्टे व उपाध्यक्ष सौ.प्रेमलता गुरव, वारगाव गाव सचिव संजय धुमक यांनी हिंदलॅब कर्मचाऱ्यांचे स्वागत करत केले. या शिबिराला साळिस्ते गावचे नवनिर्वाचित सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य तेजल कुडतरकर, गिरीश कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा दिल्या.

कणकवली व वैभववाडी तालुक्यातील असंख्य गावातील सभासदांनी या शिबिरात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भारतीय संघ सिंधुदुर्ग जिल्हा संघटन मंत्री ओमकार गुरव यांनी केले.

You cannot copy content of this page