माणगाव येथील पत्रकार अल्लाउद्दीन खुल्ली यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आर्थिक मदतीचा हात…

⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील पत्रकार अल्लाउद्दीन खुल्ली यांचा काही दिवसापूर्वी अपघात होऊन पायाला गंभीर दुखापत झाली आहे.त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने, तसेच त्यांना गंभीर दुखापती मुळे चालता येत नसल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आर्थिक सहाय्य म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, उपाध्यक्ष समिल जळवी यांच्या हस्ते पत्रकार अल्लाउद्दीन खुल्ली यांना आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली.

यावेळी सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर,कृष्णा सावंत आदी पत्रकार उपस्थित होते.

You cannot copy content of this page