⚡सावंतवाडी ता.०२-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित राहत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार ,जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसोजा, बाळा गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
