दशावतारातील जेष्ठ कलावंतांचा देखील होणार सत्कार
⚡कणकवली ता.३१-: साकेडी येथिल वाळकेश्वर नवतरुण प्रसादिक भजन मंडळ व साकेडीतील सर्व भजन प्रेमी ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी देखील साकेडी मध्ये विठूरायाचे प्रती पंढरपूर अवतारणार आहे. गेली अनेक वर्ष या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या वारकरी भजन स्पर्धेचे आयोजन यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या निमित्ताने दशावतार क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध दशावतारी कलावंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. यामध्ये दशावतारी कलावंत आप्पा दळवी हुबरट, संजय मेस्त्री करंजे, सुरेश गुरव हुबरट, राजू हरयाण करूळ, यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर त्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून वारकरी भजन स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार आहे. साकेडी शाळा नंबर 1 जवळील चव्हाटा या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी रुपेश मेस्त्री 9579529746, सागर राणे, भास्कर दळवी, भूषण शिरसाट, दादा वर्दम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
