देवगड अर्बन बँकेवर शिवम पॅनेलचे एकतर्फी विजय

१३ पैकी १३ जागांवर शिवम पॅनेलचे उमेदवार विजयी

⚡देवगड ता.३०-: अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. देवगड या बँकेची पंचवार्षिक निवडणूकित भाजप राष्ट्रवादी आघाडीचे शिवम पॅनल विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)काँग्रेस आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल यांच्यात चुरशीची लढत होऊन अखेर सर्वसाधारण गटातून शिवम पॅनेलचे सर्वच्या सर्व १३उमेदवार विजयी ठरले आहेत. तर सहकार समृद्धी पॅनेलला पराभव पत्करावा लागला.दोन्ही गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती

.रविवारी पार पडलेल्या निवडणूकीत या बँकेचे एकूण ११५४३ सभासद मतदारांपैकी ३३४७ मतदारांनी मतदानादाचा हक्क बजाविला व एकूण मतदान २८.९९% टक्के मतदान झाले होते.रविवारी सकाळ पासून दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते व उमेदवार गटागटाने देवगड अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयाबाहेर निकाल ऐकण्यासाठी गर्दी करून होते .
.या निवडणुकीत
शिवम पॅनल सर्वसाधारण गट (देवगड तालुका)
सदाशिव पु.ओगले, (१९४५) प्रकाश बा. राणे,( १८०८) अभय ज.बापट( १९४३) ),ऍड अभिषेक या.गोगटे,( १९३६) डॉ.अमोल ज.तेली,( १८४३) दिनेश नं. घाटे,( २०७२) समीर य.पेडणेकर( १९३१) हे शिवम पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी ठरले आहेत.
,सर्वसाधारण गट देवगड तालुक्याबाहेरील उमेदवार अनिल उर्फ बंड्या सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.एकूण सर्वसाधारण गटातून ७पैकी ७जागा शिवम पॅनेलने जिंकल्या आहेत.तत्पूर्वी एक जागा बिनविरोध निवडून आल्याने सर्वसाधारण गटातून ८ पैकी ८ जागा शिवम सहकार पॅनेलने जिंकल्या.
सहकार समृद्धी पॅनल मधून सर्वसाधारण गटातून उल्हास क.मणचेकर ( ११५४) खान अब्दूलरशीद अली,( ९९७) संतोष र.तारी,( ११३१ ) किरण ह. टेंबुलकर,( १०२७ ) रघुवीर शां वायंगणकर,( ९५७) हे पराभूत झाले बाद मते १६६ झाली.मतमोजणी ठिकाणी शिवम पॅनेलचे प्रमुख नेते ऍड अजित गोगटे,राष्ट्रवादी नेते नंदकुमार घाटे,जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस,भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,अमित साटम भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर ,सरचिटणीस शरद ठुकरूल,यांच्या उपस्थितीत सर्व विजयी उमेदवार भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.
: महिला राखीव मधून विशाखा विकास मांजरेकर( १२०२) सुगंधा सुरेश साटम,( ९७६ )हे पराभूत झाले.ललिता गजानन शेडगे(१९३८),वैशाली विद्याधर तोडणकर (१९७७)या दोन्ही उमेदवार विजयी झाले. १५९ बाद झाली.या रिंगणात असून सुगंधा साटम . .
इतर मागास प्रवर्गातून मनोज द.पारकर,( १००३) पराभूत,महादेव(बाबा)धोंडू आचरेकर (२१७५ )विजयी बाद मते १६९ झाली. अनुसूचित जाती जमाती गटातून सुरेश धाकु देवगडकर,( १०४४),पराभूत,सुरेंद्र नारायण चव्हाण (२१४३),विजयी झाले.१६० मते बाद झाली. विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटातून धनंजय तु.जोशी( १०७२)(पराभूत),संजय प्रभाकर बांदेकर(२१०९)विजयी झाले.बाद मते १६६ झाली. या प्रमाणे मते पडली.. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे,सहा. उपनिबंधक अनिल राहिंगज व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी काम पाहिले.निवडणूक मतमोजणी कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे,सहा. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जोशी,पोलीस हवालदार फकरुद्दीन आगा,महिला पोलीस हवालदार काजोल ढवण,वर्षा मोहिते,पोलीस नाईक प्राची धोपटे,पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव,कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे, निलेश पाटील यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

You cannot copy content of this page