Headlines

सदानंद सावंत यांचे २६ रोजीचे उपोषण तूर्त स्थगित

ऑनलाईन जुगार, रमी जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी दिला होता इशारा;जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे दिले आदेश

सिंधुदुर्गनगरी ता २४
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेला ऑनलाईन जुगार आणि टिव्ही वर येणाऱ्या ऑनलाईन रमी विषयक जाहिरातीवर बंदी घालावी या मागणी साठी पुकारलेले २६ जानेवारी पासूनचे बेमुदत उपोषण, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या तात्काळ कारवाईच्या आदेशमुळे समाजसेवक सदानंद सावंत यांनी तुर्तास स्थगित केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाईन जुगार मोठ्या प्रमाणात वाढत असून यात तरुण पिढीचा सहभाग मोठा आहे. मटका, जुगार, दारू यात तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. शिवाय टीव्ही वर येणारी ऑनलाईन रमी जुगार जाहिरात तरुण पिढीला जुगार व्यवसायात ओढत आहे. तसेच जिल्ह्यात अवैध धंदे सुसाट सुरू असतानाही त्याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद व्हावेत, ऑनलाईन जुगारा वर बंदी घालावी तसेच टिव्ही वर येणाऱ्या ऑनलाईन रमी विषयक जाहिरातीवर बंदी घालावी अशी मागणी समाजसेवक सदानंद सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकड़े निवेदनाद्वारे केली होती. त्याचप्रमाणे हे अवैध धंदे बंद न झाल्यास २६ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता . याची दाखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या जुगार व अन्य अवैध् धंद्यावर तात्काळ करवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक याना दिले आहेत. या बाबतचे लेखी पत्र तक्रारदार सदानंद सावंत याना प्रशासनाच्या वतीने दिल्याने २६ जानेवारीचे आमरण उपोषण तुर्तास स्थगित केले आहे.

You cannot copy content of this page