फर्नांडिस कुटुंबियांचे खास. विनायक राऊत यांनी केले सांत्वन

⚡मालवण ता.२४-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना मालवण उपतालुकाप्रमुख अंतोन उर्फ आतू फर्नांडिस यांचे निधन झाल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मालवण गवंडीवाडा येथे आतू फर्नांडिस यांच्या घरी भेट देऊन शोकाकुल फर्नांडिस कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला.

आतू फर्नांडिस यांचे अल्पशा आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झाले. एक कट्टर शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते म्हणून त्यांची ओळख होती. खास. विनायक राऊत यांनी फर्नांडिस यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. शिवसेनेने एक प्रामाणिक व कट्टर कार्यकर्ता गमावल्याची भावना यावेळी खास. राऊत यांनी व्यक्त केली. यावेळी खास. राऊत यांच्यासमवेत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, तपस्वी मयेकर, सिद्धेश मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page