वेंगुर्ले नगरवाचनालय संस्थेचे आदर्श पत्रकार, साहित्यिक, ग्रंथालय पुरस्काराचे वितरण संपन्न

⚡वेंगुर्ले ता.२३-: येथील नगर वाचनालया संस्थेतर्फे दिल्या जाणाऱया आदर्श पत्रकार, आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता, साहिित्यक, व आदर्श ग्रंथालय कर्मचारी या पुरस्काराचे वितरण रविवारी नगर वाचनालय संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नगरवाचनालय संस्थेचे उपाध्यक्ष अँङ देवदत्त परूळेकर यांच्या हस्ते रोख रक्कम, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्माचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून झाले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 14 ते 28 जानेवारी याचे औचित्य साधून येथील नगरवाचनालय संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमांत व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नगरवाचनालय संस्थेचे उपाध्यक्ष अँङ देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार दै. तरुण भारत, सावंतवाडी मधील जिल्ह्याचे डेस्क इंन्चार्ज अवधूत मधुकर पोईपकर, मालवण येथील `आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार गजानन सीताराम वालावलकर, वेंगुर्लेतील साहित्यिक पुरस्कार वीरधवल नारायण परब, कुडाळ येथील आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार राजन महादेव पांचाळ आदींचि समावेश होता.
यावेळी अन्य उपस्थित मान्यवराऔत नगरवाचनालय संस्थेचे कार्यकारीणी सदस्य नंदन वेंगुर्लेकर, महेश बोवलेकर, सदानंद बांदेकर, बंटी बिजीतकर, श्रीनिवास सौदागर, सौ. प्रमिला पाईपकर, सौ. पांचाळ, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, ग्रंथपाल गुरूदास मळीक, कर्मचारी किशोर सावंत, पुजा धावडे, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, साप्ताहिक किरातचे सहसंपादक सुनिल मराठे यासह पालक व विद्यार्थी यांचा समावेश होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त परूळेकर यांनी, वाचाल तर वाचाल हे ब्रीद आजच्या काळात फार महत्वाची आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडविताना त्यांच्या अंगातील कलागुणांनुसार पुढील विकासाचे संकेत लक्षात घेऊन त्या कलागुणांना विकसीत करण्यासाठी विषयांचे वाचन पुस्तकांच्या माध्यमातtन व्हावे. त्या विषयाचे प्रगल्भ ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे. यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी वाचनालयातील पुस्तकांचा शालेय वेळे खेरीज अवांतर वेळेत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. त्यातून ते आपल्या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करतील. व त्यांची दखलही त्या क्षेत्रात घेतली जाईल असे स्पष्ट केले.
तर संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी, आमची संस्था जी पुरस्कारासाठी निवड करते ती त्या-त्या क्षेत्रात उल्लेनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा कार्याचा गौरव करण्यासाठी करते. निवड केलेले मान्यवर यांचे त्या-त्या क्षेत्रातील वाचन हे अफाट असते. आणि ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरावेत. हा या पुरस्काराच्या मागील हेतू असल्याचे स्पष्ट केला. तसेच आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी नगर वाचनालय संस्थेत स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही उपलब्द केली आहेत. त्यांचा उपयोग करून स्व:तचे भविष्य वाचनातून घडवा असे आवाहन केले.
यावेळी सत्कार मुर्ती अवधुत पोईपकर यांनी, आपण 30 वर्षे पत्रकारीता क्षेत्रात काम करताना तरूण भारतचे समुह सल्लागार किरण ठाकूर म्हणजे तरूण भारत परीवारातील आमचे सर्वाचे मामा यांचे तसेच आवृत्ती प्रमुख शेखर सामंत यांचे मार्गदर्शन घेत काम करतो. निराधार गोरगरीबांना न्याय देण्यासाठी वृत्तपत्राची लेखणी हि महत्वाची ठरलेली असल्याचे उदारहणही त्यांनी दिले. तसेच गजानन वालावलकर यांनी, राज्यातील 12 हजार वाचनालयापैकी नगरवाचनालय वेंगुर्ले हि संस्था एक नंबरवर आहे. कोकणांत ती नं. 1 वर आहे. वाचकांच्या आवडी-निवडी पाहून दरवर्षी पुस्तकांची खरेदी केली जाते. नवीन पिढीला वाचन संस्कृतीतून घडविण्याचे काम नगर वाचनालय वेंगुर्ले संस्था करीत आहे. तर राजन पांचाळ यांनी, वाचनामुळे आपण घडलो. वाचनातून समाज घडतो. त्यासाठी वाचन हे अत्यावश्यक आहे असे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर आयोजित केलेल्या ज. बा. आरोस्कर, म. शा. भांडारकर स्मृती वकृत्व स्पर्धा त्याचप्रमाणे प्राथमिक शाळांसाठी घेण्यात आलेल्या श्रीकृष्ण स. सौदागर स्मृती सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, अ. ना. शेणई पुरस्कृत वकृत्व स्पर्धा, बालवाडी स्पर्धा, भालचंद्र कर्पे स्मृती गायन स्पर्धा, पं. जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा आणि सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह कैवल्य पवार यांनी तर आभार कार्यकारीणी सदस्य महेश बोवलेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page